विश्वस्त मंडळ

विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठान

१९ एप्रिल १९५५ या दिवशी विनोबाजींच्या शिष्यांनी, त्यांच्या जन्मस्थानासाठी एका विश्वस्त संस्थेची स्थापना केली व विनोबाजींचे चुलत बंधू रघुनाथ भावे यांनी विनोबांचे घर व त्या भोवतालची जमीन या विश्वस्त संस्थेकडे हस्तांतरित केली. अशा प्रकारे विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानाची सुरुवात झाली. 

त्यावेळच्या विश्वस्तांनी नेहमीच्या पद्धतीने ऐतिहासिक वस्तू व छायाचित्रे ठेवून त्या घराचे स्मारक न करता तेथे कृतिशील आश्रम सुरु करण्याचे ठरविले.

विनोबांनी आश्रम चालविण्याबद्दलच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. “समाजाच्या सेवेसाठीव व्यक्तीच्या आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी (आत्मोन्नती) आश्रमाची स्थापना करून  तो तशा प्रकारे चालविला जावा- आश्रम कृतिशील (कर्मप्रधान) असावा, जेथे शारीरिक श्रमांना महत्व असेल. आश्रमवासींनी अहिंसक क्रांती कार्यांमध्ये सहभागी व्हावे. आश्रमाचे अस्तित्व, आपल्या समाजकार्यासाठी पूरक असावे. आश्रमाचा देशभरात व जगातही मोठा जनसंपर्क असावा. आश्रमातील जगणे आनंदी असावे पण म्हणून सुखवस्तू असावे असे नाही. येथील जीवनात आव्हाने असावीत जी लोकांना कठीण परिस्थितीत किंवा असुविधेतही समाधानी आणि आदर्श राहण्याची शिकवण देतील…” असे त्यांनी सांगितले होते.

हे विचार मनात बाळगूनच, महाराष्ट्रातल्या ‘गागोदे’, या विनोबांच्या जन्मस्थानी, ६ एप्रिल १९५९ या दिवशी सर्वोदय आश्रमाची सुरुवात झाली. या दिवसाला विशेष महत्व होते. कारण याच दिवशी गांधीजींनी रौलेट ऍक्ट विरुद्ध सत्याग्रहाला सुरुवात केली होती. या दिवशी स्वातंत्र्यलढ्यासाठी ‘सत्याग्रह’ हे हत्यार गांधीजींनी भारतीयांना दिले. तेव्हा पासून हा दिवस ‘सत्याग्रह दिन’ म्हणून ओळखला जातो. 

गांधीजींच्या निधनानंतर विनोबा म्हणाले होते, की “स्मारक बांधण्यापेक्षा त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वास्तू बांधून ते साध्य होणार नाही. किंबहुना, अशा वास्तूंमुळे मुळातली तत्वे आणि त्यांच्या गाभ्याशी असणारे विचार लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत अशीच शंका मला वाटते. आपल्या जीवनात बदल घडणे महत्वाचे आहे. ‘सर्वोदयी’ विचार आणि त्यांचा मतितार्थ  देशभर पसरवता आला तर तेच बापूंचे खरे स्मारक ठरेल”.  

विनोबांच्या याच मार्गदर्शक तत्वांचे स्मरण ठेवून त्यांच्या मृत्यूनंतरही, जन्मस्थान येथे पारंपरिक स्मारक न करता आश्रमच निर्माण केला गेला. गेली ६६ वर्षं, त्याच जागेत आश्रमाचे काम सुरु आहे. या काळात हे घर कधीही बंद ठेवले गेले नाही. तसेच सकाळची आणि सायंकाळची प्रार्थना कधीही चुकलेली नाही. विनोबांच्या शिकवणीचे पालन करत, सर्वोदयी आजही तेथे काम करत आहेत.

नीला आपटे

सरिता राजभार

उत्पल वा ब

माधव सहस्रबुद्धे

नीला आपटे या सध्या विनोबा जन्मस्थान येथे वास्तव्यास आहेत. समाज कार्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून गेली २५ वर्षं दर्जात्मक शिक्षण या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. वेगवेगळ्या सामाजिक चळवळी आणि कार्यांशी त्या संबंधित आहेत. तसेच, त्यांनी विपुल लेखन केले असून विनोबांचे जीवन आणि तत्वज्ञान या विषयावरचे त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.
उत्तरप्रदेशातील आझमगड येथील सरिता राजभार, या गेली २२ वर्ष विनोबा जन्मस्थान येथे राहत असून, गेली अनेक वर्षे, शेती आणि गोपालन / गोशाळेसंबंधित कामांची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.
उत्पल वा ब हे सध्या 'मिसा' या ऑन लाईन मराठी वेब पोर्टलचे संपादक म्हणून काम पहात आहेत. प्रामुख्याने लेखन, संपादन क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी, औद्योगिक विक्री, बाजारपेठेसंबंधित संशोधन व जाहिरात क्षेत्रात काम केले आहे. तत्वज्ञान, सामाजिक- राजकीय विचार प्रवाह, साहित्य व चित्रपट हे त्यांच्या कुतूहलाचे व अभ्यासाचे विषय आहेत.
व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेले माधव सहस्त्रबुद्धे यांना, 'खादी' या विषयाची विशेष आवड आहे. त्यांनी सूत कताई त्याचप्राणे किरीगामी या कागद (हस्त) कलेत प्राविण्य मिळविले आहे. 'कापूस ते कापड', या कार्यशाळेतून भारतभरात, सूत कताई तसेच कापड बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल ते मार्गदर्शन करतात. सेवाग्राम येथील 'आनंदनिकेतन शाळा' व वर्धा येथील 'ग्राम सेवा मंडळ' या संस्थांशीही ते संबंधित आहेत.

मुक्ता नार्वेकर

डॉ. श्रीराम जाधव

सरस्वती कुवळेकर

ज्ञानप्रकाश मोदनी

बेनझीर जाधव

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुक्ता नार्वेकर, त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या 'BELIEF' संस्थेच्या माध्यमातून अंगणवाड्यांबरोबर काम करतात. घन कचरा व्यवस्थापन क्षेत्रातही त्यांनी तज्ज्ञता मिळवली आहे.
औरंगाबादचे इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक, डॉ. श्रीराम जाधव हे सर्वोदयी कार्यकर्ता असून संघर्ष वाहिनी चळवळीत तसेच नामांतर लढ्यातही ते सक्रीय होते. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे सेवाग्राम आश्रमाचे ते माजी सचिव आहेत.
संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सरस्वती कुवळेकर या मुंबई आकाशवाणी केंद्रावर मुख्य वृत्त संपादक आहेत. सर्वोदयी पार्श्वभूमी असलेल्या कुवळेकर, रसायनविरहित सेंद्रिय बागकामाच्या सक्रीय पुरस्कर्त्या आहेत.
औरंगाबादचे कारखानदार ज्ञानप्रकाश मोदनी, गेली ३४ वर्षं औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १ लाख अंगणवाड्यांना, सकस माध्यान्ह भोजन पुरवत आहेत. सध्या विविध सर्वोदय संघटनांशी ते संबंधित आहेत.
वैद्यकीय पदवी प्राप्त बेनझीर जाधव, औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकवितात.

विजय दिवाण

गेली ४० वर्षं श्री. विजय दिवाण जन्मस्थान येथे राहून तेथील देखभाल करत आहेत. ते विनोबांचे शिष्य असून १९८२ पासून ते ‘सर्वोदय’शी संबंधित आहेत. ‘ग्रामदान’ चळवळीतही त्यांनी काम केले होते.

शेती, गायींची काळजी, मृत जनावरांचे कातडे काढणे, गायींचे रक्षण करणे, इ. त्यांच्या पुढाकाराने झालेली कामे आहेत. विनोबांनी स्थापन केलेल्या वाई येथील कोटेश्वर विश्वस्त संस्थेचा त्यांनी कायाकल्प घडवून आणला. २०१७ साली समाज कार्यासाठीचा मानाचा, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. 

मृत जनावरांचे कातडे काढून त्यापासून चामडे बनविण्याचे काम विजयजी गेली बरीच दशके करत आहेत. लोकांचा जातींबद्दलचा समज बदलावा तसेच गांधीजींचे गोसंरक्षणाबाबतचे विचार लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती व्हावी या उद्देशाने ते हे काम करत आहेत. याच मुद्द्यावर त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

त्यांचे प्रकाशित झालेले अन्य मराठी साहित्य असे आहे – आचार्य विनोबा भावे, नरहर शंभूराव भावे, स्वामी केवलानंद सरस्वती, परचुरेशास्त्री (गांधीजींच्या काळात, सेवाग्राममध्ये काम केलेले एक संस्कृत पंडित, यांचे चरित्र), विनोबांची तपोभूमी : वाई, मृत गुरांचे शवच्छेदन, तसेच गांधी विनोबा पत्रव्यवहाराचा एक संपादित खंड.

मुंबई मिरर वृत्तपत्रातील लेख २७ सप्टेंबर २०१८