शेती

शेती हा जन्मस्थान येथील जीवनाचा महत्वाचा व मध्यवर्ती घटक आहे. येथील लोक, स्वतःसाठी लागणारे तांदूळ, हळद, नाचणी तसेच इतर भाज्या व कडधान्ये स्वतः पिकवतात. ही शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते. खते व कीड नियंत्रणासाठी केवळ नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो.

पेरणी, कापणी अशा शेतीतल्या विविध कामांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्वयंसेवकांना केले जाते. या सामूहिक कामात शेजारील गावांमधील गावकरी, जवळच्याच पेण नगरातील  (रायगड जिल्हा) तसेच पुणे शहरातील काही हितचिंतक सामील होतात. या शेतीतून ६ महिने पुरेल इतके उत्पादन मिळते. वर्षाच्या उर्वरित काळातील गरज भागविण्यासाठी थोडे अन्न धान्य खरेदी करावे लागते.